Pandharpur Wari Significance : आषाढीची वारी म्हटलं की, सर्वांना टाळ-मृदूंग

Pandharpur Wari Significance : आषाढीची वारी म्हटलं की, सर्वांना टाळ-मृदूंग

Pandharpur Wari Significance : आषाढीची वारी म्हटलं की, सर्वांना टाळ-मृदूंग

यांच्या गजरात, अभंग-ओव्यांच्या नामसंकीर्तनात दंग झालेले, माऊलीच्या दर्शनाची आस डोळ्यात बाळगून मैलोनमैल पायी प्रवास करणारे वारकरी आठवतात. दरवर्षी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून हजारो-लाखो वारकरी पंढरपूरला जातात. या वारीच्या काळात पालखी सोहळ्याला विशेष महत्व असते. दरवर्षी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आळंदीतून पंढरपूराकडे रवाना होते. पण या पालखीचे महत्त्व काय आहे आणि दिंडीला पालखीची जोड कधीपासून मिळाली हे तुम्हाला माहिती आहे का? इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी या कितीतरी वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेच्या इतिहासाबद्दल माहिती दिली आहे.

दिंडी म्हणजे काय?

सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिडी म्हणजे काय हे समजावून देताना सदानंद मोरे म्हणाले की, "ज्ञानेश्वर महाराजांपासून ते तुकाराम महाराज यांच्या पर्यंतची वारीची परंपरा म्हणजे गावोगावचे लोक पंढरपूरला जायचे. ते कसे जायचे? तर वारी ही वैयक्तिक पातळीवरची साधना मार्गातील उपासना नाही. वैयक्तिकरित्या तुम्ही कधीही पंढरपूरला जाऊ शकता, तुम्हाला कोणी अडवणार नाही. पण त्याला तुम्ही वारी म्हणणार नाही. वारी ही एक सामूहिक उपासना आहे. म्हणजे पंढरपूरपर्यंत समूहाने जायचं आणि आशा समूहाला आपण दिडी म्हणतो. दिडी म्हणजे वारीचा लहान घटक."

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow